बिग बॉस घराचा कोण असेल नवा कॅप्टन ?

कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी विजयी टीममधील दोन सदस्यांना ही उमेदवारी द्यायची आहे असे बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना काल सांगितले. त्यानुसार नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांनमध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कोण उभे राहील यामध्ये वाद – विवाद सुरु झाले. शेवटपर्यंत नंदकिशोर, स्मिता, मेघा आणि शर्मिष्ठा यांची टीम या निर्णयापर्यंत पोहचू शकली नाही आणि त्यामुळेच विरुध्द टीमला हा निर्णय घेण्याची जबाबबदारी सोपवली. त्या टीमने स्मिता आणि नंदकिशोर यांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे केले. आज नंदकिशोर आणि स्मिता या दोघांच्या टीम मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. हे कार्य महेश मांजरेकर यांनी आखून दिले आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. तेंव्हा आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणे रंजक असणार आहे.

काल मेघा आणि पुष्कर मध्ये झालेल्या वादामध्ये पूर्ण घर मेघा विरुध्द होते. शर्मिष्ठा आणि स्मिता तितक्या या वादामध्ये सहभागी नव्हत्या झाल्या. परंतु रेशमआस्ताद, नंदकिशोर,पुष्कर आणि सई या सगळ्यांनीच मेघाला ती खोटारडी आहे असे म्हंटले. मेघाने देखील तिला आलेला राग व्यक्त केला. आज मेघा पुष्करशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु पुष्कर मेघाला त्याला तिच्याशी बोलण्यात रस नाही असे सांगणार आहे. हे भांडण कधी पर्यंत असेच सुरु रहाणार आज महेश WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर घरातील सदस्यांना काय गाईडन्स देतील big boss

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.