बिग बॉस मराठीचा हा आठवडा पुष्कर, मेघा, सई यांच्या ग्रुपसाठी थोडा तणावाचा आणि वाद विवादांचा ठरला. पुष्कर आणि सई यांनी मेघावर असलेली नाराजगी व्यक्त केली. पुष्कर, सई, रेशम, आस्ताद, नंदकिशोर हे सगळेच मेघा विरोधात आले. काल सर्व सदस्यांना एकमेकांबद्दल जे काही वाटते ते एका पत्राद्वारे लिहायचे होते. ज्यामध्ये पुष्करने देखील मेघासाठी प्र लिहिले होते. जे आज पुष्कर सईला सांगणार आहे. आज पुष्करने सई आणि मेघा जवळ त्याच्या भावना व्यक्त केल्या. ती त्या दोघींवर प्रेम करतो. मेघाचा तो खूप रीसपेक्ट करतो जे काही मागील दिवसामध्ये झाले ते मी विसरून आता पुढे जायला तयार आहे. तुम्ही दोघी मला सोडून नका जाऊ असं म्हणतं पुष्कर खूपच भाऊक झाला. तेंव्हा आज हे तिघे परत एकत्र येणार.