प्रत्येकाच्या मनामनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाला करावी लागणारी धडपड दाखविणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि प्रस्तुत आणि प्रमोद पवार दिग्दर्शित हा चित्रपट २४ ऑगस्टलाप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक प्रमोद पवार यांच्या मेहनतीचं व जिद्दीचं कौतुक करताना अभिनेते राजदत्त आणि आदेश बांदेकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. ही कथा आपल्या सगळ्यांची आहे असं सांगत आपल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
मीना चंद्रकांत देसाई , नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाचे निर्माते असून मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी,मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर,विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत.
Leave a Reply