पुष्कर आणि शर्मिष्ठा शिक्षकाच्या भूमिकेत

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील रंगणार “मस्ती कि पाठशाला” हे कार्य. ज्यामध्ये काल सई आणि आस्ताद शिक्षकाच्या भूमिकेत दिसले. आज देखील हा टास्क घरामध्ये खेळला जाणार आहे. अंदाजे तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काहीना काही शिकले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी शाळे सारख्या अनेक गोष्टी शिकल्या. शाळा म्हंटल कि,वर्गामध्ये दबदबा असलेला monitor, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, शेवटच्या बेंचवर बसणारी दंगा घालणारी मुलं, असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात. या टास्कमध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक बनले आहेत. काल सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली आणि आज देखील करणार आहेत हे नक्की. सई आणि आस्ताद काल शिक्षक बनले होते. आज या टास्कमध्ये घरातील सदस्य काय मज्जा मस्ती करणार…vlcsnap-error478

आज टास्कमध्ये मेघा आणि शर्मिष्ठा शिक्षिका आणि पुष्कर शिक्षक बनणार आहेत. या एका वेगळ्याप्रकारच्या टास्कमुळे सदस्यांना देखील मज्जा येत आहे. हा टास्क करत असताना सगळ्याच सदस्यांना शाळेची आठवण येत असणार हे निश्चित. आज मेघा शिक्षिका असताना विद्यार्थी बनलेले सदस्य मेघाला बरीच दमछाक करायला लावणार आहेत. शिक्षिका बनलेल्या मेघाला थोडासा त्रास देण्यासाठी सगळे विद्यार्थी बाथरूम मध्ये गेले असता मेघा त्यांना तिथेच बंद करणार आहे. मेघा शिक्षिका असताना मुलांनी तिच्या वर्गात बराच दंगा केला आणि तो आज प्रेक्षकांना बघायला मिळणार असून तो बघताना त्यांना बरीच मज्जा देखील येणार आहे. तसेच शर्मिष्ठाच्या वर्गामध्ये सगळे त्यांना आवडणारे चित्र काढणार आहेत. तसेच आज पुष्कर देखील शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.