कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ‘ललित २०५‘ स्टार प्रवाह घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. या कुटुंबाची प्रमुख आहे आजी… कुटुंबातील दुभंगलेली मनं जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचं चित्रण या मालिकेत करण्यात आलं आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणं दुर्मीळ होतंय. या पार्श्वभूमीवर, आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या आजीची धडपड असलेलं कथानक हे या मालिकेचं वैशिष्ट्य ठरणार आहे.
‘ललित २०५’मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे,संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे.
Leave a Reply