‘‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीचा ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग आता ७ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ येतोय ७ डिसेंबरला

Leave a Reply