सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर – संग्राम समेळ

lal80718नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका  स्टार प्रवाहवर सुरु झालीय. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित

⏺’ललित २०५’चं वेगळेपण काय सांगशील?

–    इतर कौटुंबिक मालिकांपेक्षा ही नक्कीच एक वेगळी मालिका आहे. एकत्र कुटुंबाची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. आजी आणि नातवाचं वेगळं नातं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येईल. या मालिकेत मी नातवाची भूमिका साकारतो आहे. आजवरच्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे. नीलची स्वत:ची अशी मतं आहेत. त्यामुळेच ‘ललित २०५’ही मालिका माझ्यासाठी स्पेशल आहे.

⏺‘ललित २०५’ मध्ये सुहास जोशींसोबतच अनेक अनुभवी कलाकार मंडळी आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे

– खुपच छान. मालिकेची टीम चांगली असली की त्याचं प्रतिबिंब आपसुकच मालिकेत दिसतं. पहिल्या दिवसापासूनच आमची छान गट्टी जमलीय. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आम्ही ठरवून एकत्र करतो. आम्हाला एकत्र ठेवण्यात सुहासताईंची महत्त्वाची भूमिका आहे. त्या आम्हा सर्वांचीच खूप काळजी घेतात. फावल्या वेळात आम्ही खूप गप्पाही मारतो. सीनमधल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही करतो. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने मला एक छान हसतं खेळतं कुटुंब लाभलंय असंच म्हणायला हवं. यासाठी मी स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शन्सचा कायम ऋणी राहीन.

   ⏺या मालिकेसाठी खास ठाण्यात सेट उभारण्यात आलाय त्याविषयी..

– ‘ललित २०५’चा सेट म्हणजे खऱ्या अर्थाने नंदनवन।  आहे. बारीक-सारीक गोष्टींचा विचार करुन हा सेट उभारण्यात आलाय. राजाध्यक्ष फॅमिलीचा पैठणीचा व्यवसाय आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सेटसाठी पैठणीचा वापर करण्यात आलाय. घराचे पडदेही साडीपासून बनवण्यात आले आहेत. या वास्तूत प्रवेश करताच आपसुकच सकारात्मक ऊर्जा मिळते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: