
– राज चिंचणकर
रंगभूमीवर आपला दमदार ठसा उमटविलेले लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी आता एका वेगळ्या ‘भूमिकेत’ दिसणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी रुपेरी पदड्यावर येऊ घातलेल्या ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे त्यांनी स्वीकारली आहेत. रंगभूमी ते चित्रपट हे त्यांचे स्थित्यंतर कशा पद्धतीचे आहे, हे समजण्यासाठी ३१ ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.
गिरीश जोशी यांनी काही चित्रपट लिहिले आहेत; परंतु चित्रपटाचे दिग्दर्शन मात्र ते प्रथमच करत आहेत. चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे. ते म्हणतात, पाल्य आणि पालकत्व या विषयाशी संबंधित हा चित्रपट असून सायबर क्राईम पद्धतीची हाताळणी आम्ही या चित्रपटात केली आहे. काही खऱ्या घटनांवर आधारित असलेल्या या चित्रटपटातून सावधगिरीचा इशाराही प्रेक्षकांना मिळेल.
या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे, जयवंत वाडकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, आदिनाथ कोठारे यात खलनायकी भूमिका साकारत आहे.
Leave a Reply