‘नकळत सारे घडले’मधल्या कलाकारांचं भारतमातेला वंदन
‘स्टार प्रवाह’वरच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रतापराव म्हणजेच हरीश दुधाडे आणि प्रिन्सदादा म्हणजेच आशिष गाडेने आपल्या गाण्यातून भारतमातेला वंदन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीताचं अनप्लग्ड व्हर्जन हरीश आणि आशिषने मिळून तयार केलंय. सावरकरांच्या मूळ चालीमध्येच हरीशने हे गीत गायलंय. शिवाय या गाण्याचा व्हिडिओ समुद्रकिनारीच शूट करण्यात आलंय.
PROMO : https://www.youtube.com/watch?v=CcwyWDvyyDc&feature=youtu.be
एखादा संगीतकार जेव्हा गाण्याला चाल लावतो तेव्हा ती चाल गाण्यातल्या शब्दांना अधिक समर्पक बनवत असते. हे गाणं बनवत असताना आम्ही प्रत्येक ओळीला सावरकरांनी अशी चाल का दिली असेल? कोणत्या भावनेतून दिली असेल? याचा विचार करत होतो. त्यामुळे त्या गाण्यामध्ये दडलेला अर्थ नव्याने आमच्यासमोर आला अशी भावना आशिष गाडेने व्यक्त केली.
तर हरीशने या गाण्याविषयीचा अनुभव सांगताना म्हण्टलं की.. ‘मला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. नकळत सारे घडलेच्या सेटवर माझी आणि आशिषची ओळख झाली. माझी आणि आशिषची आवड सारखीच असल्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमली आणि शूटिंगमधल्या फावल्या वेळेत आम्ही आमची आवड जोपासू लागलो. देशभक्तीपर गाणी करण्याची आमची इच्छा होती. ‘ने मजसी ने…’ या गाण्याने त्याचा सुरुवात झाल्याचा आनंद आहे.’
हरीश आणि आशिषने आपल्या गाण्यातून भारतमातेला केलंलं हे वंदन नक्कीच श्रवणीय आहे.
Leave a Reply