परीक्षण – “दिनूच्या सासूबाई राधाबाई ” असा दिनू अशी सासू ..

IMG_8065.JPGराठी रंगभूमीवर विनोदी नाटके सतत येत आहेतविनोदी नाटकातून करमणूक करीत प्रबोधन सुद्धा केलं जाते हे आपणास नाकारता येत नाहीविनोदी नाटकामध्ये ” फार्स ” हा सर्वसाधारणपणे १९६० च्या सुमारास बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांनी रंगभूमीवर सादर केलात्यावेळी बबन प्रभू लिखित ” झोपी गेलेला जागा झाला ” आणि ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” हे दोन फार्स सादर केले होते त्याकाळी ते खूप गाजले होतेआजच्या घडीला वेद प्रोडक्शन ने सादर केलेला आणि विश्वस्मे प्रोडक्शन ची निर्मिती असलेला ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” हे नाटक रंगमंचावर धमाल करीत आहे.

दिनू नाडकर्णी यांच्या घरात हि कथा घडतेदिनूची सासू राधाबाई हि एक इरसाल,भांडण करण्यात पटाईत अशी असून तिचे पती कनैह्या हे दोघे चार महिन्यासाठी दिनूच्या कडे राहायला आलेले असतातदिनूच्या घरी त्याचा मेव्हणा रवी हा राहायला आलेला असतोत्याची एक भानगड असतेत्याने हिरा नावाच्या मुलीबरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न केलेलं असते त्याला एक बाळ सुद्धा असतेदिनूची बायको मीना हि सुस्वभावी पण तिची बहीण प्रीती हिला अभिनेत्री बनायचे असते त्यासाठी मेनकादेवी ह्या अभिनेत्री ला आमंत्रण दिलेले असतेत्यामध्ये रवीहिरा ह्यांचे लग्न झालेलं आहे कोणालाच माहित नसल्याने घोटाळेगैरसमज वाढत असतातसासऱ्याने दिनूकडे आणलेला ऑर्गन दुरुस्ती करण्यासाठी दिनूच्या मित्राने डॉ नाय ने पुढाकार घेतलेला असतोत्यातून अनेक गैरसमज वाढत जातातहे नेमके काय काय घडत असते ते मी सांगणार नाहीतुम्हीच अनुभव घ्या.

सासू राधाबाई ची भूमिका नयना आपटे यांनी रंगतदार केली आहेदिनूच्या भूमिकेत संतोष पवार आणि डॉ नाय च्या भूमिकेत विनय येडेकर मजा आणतातत्यांना साथ इरावती लागू मेनका देवी }, दीपश्री कवळे हिरा }, रोनक शिंदे रवी }, ऋतुंभरा माने प्रीती }. वैभवी देऊलकरधुरी मीना यांनी साथ दिली आहेपळापळधावपळसमजगैरसमज ह्यातून हे नाटक फुलत असले तरी नाटकाचा पहिला अंक हा बराच लांबलेला जाणवतोपण दुसरा अंक प्रेक्षकांची पकड घेतोसंतोष पवार यांनी आजच्या काळाला अनुसरून काही योग्य ते बदल करून नाटक दिगदर्शित केलं आहे  संतोष पवार विनय येडेकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी बरोबरच संपूर्ण नाटकात नयना आपटे यांनी रंगवलेली सासूबाई राधाबाई लक्षांत राहतातपळापळधावपळसमजगैरसमज इत्यादींनी नाटक रंगतदार बनले आहेपूर्वी बबन प्रभू आत्माराम भेंडे यांचा विनोद वेगळ्या धाटणीचा होतासंवादफेक आणि विनोदाचे अचूक टायमिंग हि खास असायचीआता संतोष पवार विनय येडेकर यांनी तो बाज आणण्याचा प्रयत्न चांगला केला आहेनेपथ्य प्रकाश योजना योग्य अशी असून संगीत सुद्धा चांगले आहे.

एकंदरीत दिनूची कमाल आणि सासूची धमाल असे हे नाटक आहे.

 

दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.