‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी टॅग लाईन असलेल्या या टीझरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १२ ऑक्टोबरला होईलच. तत्पूर्वी चित्रपटाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नव्या चेहऱ्यांसोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात आहेत.
या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे. धनश्री विनोद पाटील आणि सुहास जहागीरदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
टीझर लिंक – https://youtu.be/gpO4JhwnYxE
Leave a Reply