‘पार्टी’ या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले आहे. ‘काळजात घंटी वाजते’ असे या गाण्याचे बोल असून, मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली गुलाबी दुनिया या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, स्तवन शिंदे, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या सिनेमातील प्रमुख कलाकारांवर हे रॉमेंटीक गाणे चित्रित करण्यात आलेले आहे.
‘पार्टी’ सिनेमातील ‘काळजात घंटी वाजते’ हे गाणे आजच्या तरुण पिढीला भुरळ पाडणारे ठरत आहे. मित्रांच्या खाजगी आयुष्यातील गुलाबी क्षणचित्रे मांडणाऱ्या या रॉमेंटीक गाण्याचे लेखन गुरु ठाकूर यांनी लिहिले असून, अमितराजने संगीत दिलेल्या या गाण्याला स्वतः अमितराज आणि निहिरा जोशीने आवाज दिला आहे. मित्रांची दुनियादारी आणि त्यासोबतीला प्रेमाची फोडणी असणाऱ्या या सिनेमात सुव्रत जोशी – प्राजक्ता माळी आणि अक्षय टंकसाळे – मंजिरी पुपाला अशी जोडगोळीदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत ‘पार्टी’ या सिनेमातील हे गाणे आजच्या तरुण मनात प्रेमाची पालवी फुलवणारे ठरत आहे.

Leave a Reply