‘परी हूँ मैं’ चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच

ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक,कौटुंबिक आणि भावना प्रधान ‘परी हूँ मैं’ चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँचIMG-20180818-WA0001 झाला आहे. या चित्रपटाला‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०१८’ मध्ये उत्कृष्ठ मराठी चित्रपट आणि उत्कृष्ठ मराठी अभिनेत्री पुरस्कार मिळाला आहे, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘परी हूँ मैं’ चित्रपट नावाजला गेला आहे.

‘परी हूँ मैं’ या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये साजरी दिघे ऑडिशन देताना दिसते, तिच्या बोलक्या आणि निरागस अभिनयातून तिला एका मालिकेत परी नामक ऐश्वर्यसंपन कुटुंबातील लाडक्या मुलीची भूमिका साकारायची संधी मिळते. साजरीचे वडील माधव दिघे हे तिच्याबाबत संवेदनशील आणि अतिशय महत्वाकांक्षी असून शूटिंगच्या वेळी ते तिच्यासमवेत सावलीप्रमाणे राहतात. तर दुसरीकडे अभिनयाच्या आणि झगमगाटाच्या दुनियेत आपल्या मुलीचे बालपण कुठे हरवू नये, याची तिच्या आईला काळजी आहे.प्रसिद्धी मिळाल्यानंतर साजीरी आणि तिच्या कुटुंबात होणाऱ्या बदलांचा वेध ‘परी हूँ मैं’ या चित्रपटात घेतल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.चंदेरी दुनियेकडे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ध्येयपूर्तीची वाटचाल सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत.

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी,बालकलाकार श्रुती निगडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘परी हूँ मैं’ या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत. चित्रपटात तीन गीते असून प्रत्येक गीत वेगळ्या जॉनरचे आहे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस,जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे. शंकर महादेवन यांनी ‘वेगे वेगे धावू’ हे गीत गायले असून अमृता फडणवीस यांनी ‘चंदण बिलोरी’ ही अंगाई तर मंदार पिलवलकर यांनी ‘चंदण बिलोरी’चे मेल व्हर्जन गायले आहे. ‘परी हूँ मैं’ चे शीर्षकगीत जिया वाडकर हिने गायले असून तिचे हे पहिले पार्श्वगायन आहे.

बहुचर्चित मध्यमवर्गीय दिघे कुटुंबातीलसाजिरी ‘परी’ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.