– राज चिंचणकर
मराठी चित्रपट सध्या विविध प्रकारचे विषय हाताळताना दिसत आहे. असाच एक विषय म्हणजे ‘चंदेरी दुनिया’! या दुनियेचे आकर्षण अनेकांना असते. लहान मुलेही त्याला अपवाद नाहीत. किंबहुना, डोळ्यांना जे दिसते त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे ही मुलांची मनोवृत्तीच असते. त्याचेच प्रतिबिंब ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटात पडलेले दिसणार आहे.
७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटातल्या ‘वेगे वेगे धावू’ या गाण्याला अनुसरुन या चित्रपटाचा प्रवासही तसाच होईल, अशी या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केलेली आशा सफल व्हायला हरकत नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकप्रिय झालेले यातले हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार यांच्या प्रमुख भूमिकांसह बालकलाकार श्रुती निगडे हिची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे.
Leave a Reply