
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या या भूमिकांना रसिकांनी उत्तम दादही दिलेली आहे. मात्र प्रत्येक कलाकाराला त्याच्या कारकिर्दीत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असतो. मृण्मयीची ही इच्छा बहुधा पूर्ण होण्याच्या मार्गावर असावी. कारण, ‘माझ्या अभिनयाची चौकट मोडून काढणारा चित्रपट’ असे वर्णन तिने तिच्या ‘बोगदा’ या आगामी चित्रपटाविषयी बोलताना केले आहे.
इच्छामरण या विषयाचा संदर्भ असलेला हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेल्या या कथेत मृण्मयीने मुलीची; तर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी आईची भूमिका साकारली आहे. ‘बोगदा’चे लेखन व दिग्दर्शन निशिता केणी यांनी केले आहे. सामाजिक व कौटुंबिक विषयाला या कथेद्वारे हात घालण्यात आला असून, मृण्मयी म्हणते त्याप्रमाणे तिच्या भूमिकेचे वेगळेपण अनुभवण्यासाठी पुढचा महिना उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
Leave a Reply