
गेल्या ८ वर्षापूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अगडबम’ सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमातील सर्वांची लाडकी ‘नाजुका’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, ‘माझा अगडबम’ मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कारण, या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेबरोबरच लेखिका. दिग्दर्शिका, निर्माती अश्या त्रीसुत्री भूमिकेतही ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात, नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत, मराठीचा सुपरस्टार अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. त्यामुळे,अभिनयात वैविध्यपण जपणाऱ्या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची वजनदार मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरपोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र हि व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
Like this:
Like Loading...
Related
Leave a Reply