मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणाऱ्या ‘फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नतीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ‘फिल्मीदेश’ उपक्रमान्वये, भारताबाहेरील रसिकांपर्यंत बहुसंख्य प्रमाणात मराठी सिनेमे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती आहे. मात्र विदेशातील वितरण निर्बंधनामुळे हवे तितक्या प्रमाणात प्रादेशिक सिनेमे तिकडच्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, परदेशातील मराठी प्रेक्षकांसाठी त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेली ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बोगदा’ आणि ‘टेक केअर गुडनाईट’ हे तीन मराठी चित्रपट पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत उतरवली जात आहेत.
Leave a Reply