परीक्षण – ” टेक केअर गुड नाईट ” इंटरनेट वापरताय काळजी घ्या…

सायबर, इंटरनेट हे शब्द आज प्रत्येकालाच माहित झाले आहेत, सर्वसाधारण प्रत्येकजण इंटरनेट चा वापर करीत असतो. आजची तरुणपिढी तर ह्या मध्ये गुंतूनच गेली आहे, इंटरनेट प्रमाणे फेसबुक वर एकमेकांशी गप्पा मारणे हे तर रोजचेच झाले आहे. इंटरनेटचा वापर आपण ऑनलाईन बुकिंग, बँकेचे व्यवहार करण्यासाठी नेहमीच करीत असतो, प्रत्येकाला त्याची संपूर्ण माहिती असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे सायबर गुन्हे घडत असतात, ह्याच अश्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित ” टेक केअर गुड नाईट ” ची निर्मिती केली आहे.
अविनाश पाठक, आसावरी, सानिका हे मध्यवर्ती कुटुंब असून अविनाश पाठक हे एका गिअर बॉक्स बनविणाऱ्या कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर ह्या पदावर काम करीत असतात. गिअर बॉक्स बनविण्याचे काम कंपनी बंद करणार असल्याने अविनाश यांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे आणि कंपनी मध्ये पुढे काम करावे असे कंपनीला वाटत असते पण अविनाश कंपनी मधून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतात आणि नोकरी सोडतात. निरोप समारंभाच्या वेळी ते आपण कुटुंबासमवेत युरोप ट्रिप करणार असल्याचे सांगून ते युरोप टूरवर निघून जातात, ज्यावेळी परत येतात त्यावेळी त्यांना कळते कि आपल्या बँकेमधून बावन्न लाख रुपये कोणीतरी ऑनलाईन काढून घेतले आहेत. त्यानं धक्का बसतो, बँकेत जाऊन चौकशी करतात त्यावेळी बँक त्यांना पैसे ऑनलाईन काढून घेतल्याचे स्टेटमेंट दाखवते. मग अविनाश सायबर क्राईम ब्रँच च्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवितात आणि मग उत्कंठा वाढविणाऱ्या घटनांना सुरवात होते. Photo-1.jpg इन्स्पेक्टर पवार याना पाठक कुटुंब कसे मदत करते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमामध्ये मिळतील ?
अविनाश पाठक ची भूमिका सचिन खेडेकर यांनी सहजतेने केली असून आसावरी पाठक ची भूमिका इरावती हर्षे यांनी केली असून त्या एक समुपदेशक आहेत पण एकाच घरात राहून त्यांचे त्यांच्या मुलीकडे सानिका  लक्ष नाही, सानिकाची भूमिका पर्ण पेठे हिने रंगवली असून कॉलेजमध्ये जाणारी हि मुलगी आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करते असे म्हणायला हरकत नाही, तिला एकटेपणा जाणवत असल्यामुळे ती बऱ्याचवेळा फेसबुक आणि व्हिडीओ वर गप्पा मारते आणि त्यातूनच गंभीर प्रसंग तिच्यावर येतात, आदिनाथ कोठारे यांनी बद्री, सागर, गौतम, सतीश अश्या विविध छटा असलेल्या भूमिका रंगविल्या असून त्याला काहीशी खलनायकाची छटा आहे. महेश वामन मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर पवार ची भूमिका नेहमीच्या स्टाईलने सादर केली आहे. याशिवाय विद्याधर जोशी, सुलेखा तळवलकर, जयवंत वाडकर, संस्कृती बालगुडे यांची साथ उत्तम लाभली आहे. दिगदर्शक गिरीश जयंत जोशी यांनी सिनेमा गतिमान ठेवला आहे. सायबर क्राईम ह्या विषयवावरचा एक वेगळा सिनेमा त्यांनी सादर केला आहे, प्रेक्षकांची पावती मिळायला हरकत नसावी….


दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.