संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या चेहऱ्यावरीलमिश्किल भावांनी गाण्याला आणली वेगळीच मजा…
श्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाचीआपली वेगळीच धमाल… वेगळीच मस्ती…. याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेलासण म्हणजे दहीहंडी.. थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याचीवृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या यासणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणंनुकतंच लाँच करण्यात आलं आहे.
बेभान गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं… ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कीलहावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णींचा हा अंदाज पहिल्यांदाच यागाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.
करंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबध्दकेलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आणि जिद्द शब्दबध्द केली आहे. तर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात… संदीपकुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे, हे अद्यापगुलदस्त्यात असलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार
Leave a Reply