स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपती बाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरं आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. पुंडलिकाची बाप्पा परीक्षा घेणार आहे. यात बाप्पाच्या आवडीच्या गोष्टी पुंडलिकाला करुन दाखवायच्या आहेत. यातलं पहिलं कार्य असेल ते म्हणजे गणपती बाप्पाने दिलेल्या मोजक्या तांदळापासून पुंडलिकाला २१ मोदक बनवायचे आहेत आणि तेही कुणाचीही मदत न घेता. बाप्पाने दिलेलं हे कार्य पुंडलिक पार पाडेल का? विठुराया पुंडलिकाचं सहाय्य करेल का? कलीच्या कारस्थानांमुळे पुंडलिकाच्या मेहनतीवर पाणी पडणार का? या साऱ्याचा उलगडा विठुमाऊलीच्या पुढील काही भागांमध्ये होणार आहे.
‘विठुमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा

Leave a Reply