सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षयकुमार यांंचा ‘2.0’ सिनेमाचा टीजर आज रिलीज झाला. हा चित्रपट रजनीकांतच्या ‘रोबोट’चा सीक्वल आहे, याची आठवण करून देणाऱ्या या टीजरमध्ये रजनीकांत डबलरोलमध्ये आहे. जग धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी रजनीकांत आणि त्याचा रोबोट अर्थात चिट्टी पुढे सरसावतात. पण डॉ. रिचर्ड त्यांच्या मार्गात संकट बनून उभा राहतो. डॉ. रिचर्डची ही निगेटीव्ह भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.
Leave a Reply