अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. कलर्स मराठीवरीलच “हे मन बावरे” या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. “हे मन बावरे” मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे. मालिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राउत देखील असणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे.
मृणाल दुसानिसचे कमबॅक

Leave a Reply