सोनी मराठीची हास्यजत्रा

IMG-20180915-WA0006उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचाआनंद, उत्साह आणि जल्लोष यांनी नटलेला क्षण म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन… या गणेशाच्या आगमनाचा जल्लोष नुकताच साजरा झाला सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा या पहिल्या वहिल्या दणदणीत कार्यक्रमात.

प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी यांनी विघ्नहर्त्याच्या साक्षीनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या नंतर नम्रता आवटे–संभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर यांच्या साथीनी फुलली हास्यजत्रा… या चौघांच्या जुगलबंदीनी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहात हास्यस्फोट झाला. या कार्यक्रमाला चार चांद लावले आनंद शिंदे यांच्या गायकीनी…. आपल्या रांगड्या आवाजात सादर केलेल्या सदाबहार गीतांनी त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्या नंतर वस्त्रहरण नाटकाचा सादर झालेला अंशप्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला, तर सोनीमराठीवर सध्या गाजत असलेली मालिका ‘ह्रदयात वाजे समथिंग’ या चे कलाकार निखील दामले, स्नेहा चव्हाण आणि ऐश्वर्या पवार यांनी सादर केलेला नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांच्या ह्रदयात समथिंग नक्कीच वाजलं.

प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या कार्यक्रमात पुढे ‘नाद करायचा नाय’म्हणत संतोष जुवेकर यानी रंगमंचा वर प्रवेश केला आणि प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. त्या नंतर संतोष जुवेकर सोबत ’इयरडाऊन’ या सोनी मराठीवरील मालिकेत असणारी प्रणाली घोगरे हिनी सुंदर नृत्याविष्कार केला आणि याच कार्यक्रमाची थेट झलक प्रेक्षकांसमोर सादर झाली.

हास्याचा विस्फोट होत असतानाच रंगमंचावर अचानक भरत जाधव यांच्या रूपात मोरूची मावशी आली आणि प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हास्यजत्रा भरलेली असताना मोरूच्या मावशीची आठवण न काढणं शक्यच नव्हतं. विजय चव्हाण ….एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा सच्च्या कलाकाराच्या जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक ’करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली.

अशा प्रकारे सांगता झालेल्या हास्यजत्रेचा पुरेपूर आनंद प्रेक्षकांनी लुटला आणि जणू गणरायाच्या साक्षीने सोनी मराठीशी आपले नाते अजून अतूट केले .

हा कार्यक्रम येत्या १९ आणि २० सप्टेंबर रोजी रात्रौ ९.०० वा सोनी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.