बॉईज २’ या नावामुळे अधिक प्रसिद्ध होत असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाददेखील आपल्याला पाहायला मिळते.
शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येतात. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांचीदेखील यात भूमिका असल्याचे कळून येते.
Trailer Link: https://www.youtube.com/watch?v=W2b7Dc-bGnI
Leave a Reply