मीना मंगेशकर-खडीकर लिखित ‘मोठी तिची सावली’ पुस्तक लवकरच

करोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जीवन कथा सांगणारे मीना मंगेशकर-खडीकर लिखित व प्रकाशक श्री. आप्पा परचुरे प्रकाशित ‘मोठी तिची सावली’ हे पुस्तक लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहोळा २८ सप्टेंबर रोजी, लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे या सोहोळ्याचे मुख्य अतिथी असणार असून सोहोळ्याचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांसमवेत अनेक मान्यवर सोहोळ्यास उपस्थित असतील.

Avinash Prabhavalkar, Appa Parchure, Pravin Joshi, Meena Mangeshkar Khadikar, Hridaynath Mangeshkar, Usha Mangeshkar & Yogesh Khadikar at the PC of Meena Mangeshkar Khadikar's book on La

२८ सप्टेंबर रोजी, संध्याकाळी ६:३० वाजता, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी  येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहोळ्याबरोबरच  ‘हृदयेश आर्ट्स’ तर्फे अविनाश प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न सुश्री लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून ‘स्वरगंधार’ च्या सहयोगाने ‘आनंदघन’ या लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. ह्याचे निवेदन पंडित हृदयनाथ मंगेशकर करणार असून उषा मंगेशकर, विभावरी आपटे, मधुरा दातार, सोनाली कर्णिक, प्राजक्ता सातर्डेकर यांसारखी कलाकार मंडळी गाणी प्रस्तुत करणार आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: