‘बॉइज २’ मधून गिरीश कुलकर्णी करणार ‘तोडफोड’

‘बॉईज’ सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते.IMG-20180922-WA0000
‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. येत्या  ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ‘बॉईज २’ मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच ! अवधूत गुप्तेचे भन्नाट संगीत दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील ‘तोडफोड’ हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. ‘बॉईज २’ चा संवाद लेखक ह्रषिकेश कोळीने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिव आणि प्रसेनजीत कोसंबीचा आवाज लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिध्द कलाकार गिरीश कुलकर्णी यांचा हटके अंदाज आपल्याला पाहता येणार आहे. वाढदिवसावर आधारित असलेल्या या ‘तोडफोड’ सॉंगमध्येे सुवर्णा काळेचा आयटम नंबर आपल्याला पाहायला मिळतो. उडत्या लयीचे हे गाणे तरुणाईला आपल्या तालावर थिरकवण्यास यशस्वी ठरत आहे.
शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.