, ‘बॉईज २’ मधील ‘शोना’ हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेमाच्या गुलाबी थंडीची अनुभूती देऊन जाते. गीतकार मंदार चोळकर लिखित या गाण्याला, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा आवाज लाभला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि बोचऱ्या थंडीत प्रेमाची हळूवार पालवी फुलवणारं हे गाणं सुमंत शिंदे आणि सायली पाटील या फ्रेश जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणाऱ्या या गाण्यातील विहंगम दृश्य रसिकांचे मन मोहून टाकतात.
हे गाणे पडद्यावर खूप सुंदर दिसत असले तरी, त्याची पडद्यामागील मेहनत खूप मोठी होती. कारण, बर्फाळ प्रदेशातील प्रतिकूल परिस्थितीचा तडाका या सिनेमाच्या चित्रीकरणालादेखील बसला होता. तिकडच्या अतिथंडीने नाकातून रक्त आल्यामुळे अनेकजणांना दवाखान्यात दाखल करावे लागले होते. इतकेच नव्हे तर, या गाण्याच्या आणि इतर काही भागांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना ऑक्सिजन सिलेंडरद्वारे श्वास घ्यावा लागला होता. अश्या या प्रतिकूल वातावरणात चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे.

Song Link – https://www.youtube.com/watch?v=mtqKENSg1V4
Leave a Reply