– राज चिंचणकर
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या काही निर्माते एकत्र येऊन चित्रपट निर्मिती करताना दिसतात. मात्र २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘पाटील’ या चित्रपटासाठी तब्बल १८ निर्माते कार्यरत झाले आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे या चित्रपटाचे निर्माते असून; गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल, विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिगंबर, हाजी पटेल, दीपक दलाल हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. यात शिवाजी लोटण पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, एस.आर.एम एलियन आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
Leave a Reply