‘मुंबई पुणे मुंबई- ३’चा टीजर झाला प्रकाशित

पाच वर्षांपूर्वी मुंबई पुणे मुंबईला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आणि दोन वर्षांपूर्वी आलेल्या व यशस्वी ठरलेल्या त्याच्या सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. अशाप्रकारचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न असून चित्रपट वर्षाखेर प्रदर्शित होत आहे.

Mukta Barve & Swapnil Joshi- MPM-3

या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो.  

मुंबई पुणे मुंबई’ पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याने इतिहास रचला. लोकप्रियताचित्रपटगृह खिडकीवर केलेला व्यवसाय आणि या जोडीच्या घराघरात पोहोचण्याची प्रक्रिया या सर्वच बाबतीत या चित्रपटाने उत्तुंग परिमाणे स्थापित केली. चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर डुपर हिट ठरला होता. दोन वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला तेव्हा या यशाची पुनरावृत्ती झाली. आता हाच इतिहास पुन्हा गिरविला जाणार आहे. निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते व ‘52 फ्रायडे सिनेमाजचे अमित भानुशाली यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासह चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘Mumbai Pune Mumbai- 3’ Movie Teaser Link-

https://youtu.be/PcI2puuLT2gSwapnil Joshi & Mukta Barve- MPM-3

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: