नाटक – चि सौ कां रंगभूमी ‘मर्म बंधातली ठेव’

  रंगभूमी, रसिकांची आवडती, आपलासा वाटणारा रंगमंच, त्यावर रसिकांसाठी सादर केलेलं रसिकांना अर्पण केलेली कलाकृती, जिवंत नाट्यमयता आणि उर्जा देणारी कला, म्हणजे “ नाटक “ ह्या नाटकाच्या इतिहासात अनेक बदल झाले. प्रयोगाचे विविध रूपाने सादरीकरण केले गेले, संगीत आणि गद्य नाटके या रंगभूमीवर आली, त्यातील काही सुवर्ण कृतीने नटलेली पाने नाट्यसंपदा कलामंच या लोकप्रिय नाट्य संस्थेने चि सौ कां रंगभूमी या नाटकातून उलगडून दाखवलेली आहेत.

IMG_20180828_184748_911

     चि सौ कां रंगभूमी हिचे लग्न रसिकराज याच्याशी लागते आणि त्यांचा रंगभूमीवरील संसाराला सुरवात होते, रंगभूमी विविध रंगांची चैतन्य देणारी सात पावले चालून माप ओलांडून घरात येते आणि संगीत आणि गद्य रूपाने नाट्यमय प्रसंगाला सुरवात होते, नांदी ते भैरवी चा सुरमय तसेच विविध प्रसंगाने आणि भिन्न-भिन्न रसानी युक्त असलेला प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. हे सारे रंगतदारपणे, अभ्यासपूर्ण रीतीने सर्वच कलाकारांनी सादर केला आहे. रंगभूमीचा इतिहास उलगडत जाताना रसिक त्यामध्ये रंगून जातो. संगीत नाटकात स्वयंवर, मानापमान, कुलवधू, शारदा, संशयकल्लोळ, जय जय गौरीशंकर, अश्या गाजलेल्या नाटकातील लोकप्रिय पदांचा खुबीने वापर करून ती विलक्षण उर्जेने सादर केली आहेत. ह्या नाट्य गीतांना संगीत साथ ऑर्गनवर केदार भागवत आणि तबल्यावर सुहास चितळे यांची उत्तम लाभली आहे. त्याच प्रमाणे एकच प्याला, तो मी नव्हेच, फुलराणी, नटसम्राट, हमीदाबाईची कोठी, अश्या नाटकामधील प्रवेशांचे रंगतदारपणे सादरीकरण केल आहे. एक प्रसन्न आनंददायी सोहळाच आपणासमोर साकारला आहे.

      चि सौ कां रंगभूमी आणि रसिकराज यांच्या संसाराची मांडणी, त्यामधील असणारे रुसवे-फुगवे, सांभाळत जीवनातील गमतीजमतीची कोडी सोडवत सर्वकाही सुरेलपणे खुलवले आहे.

      संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी रंगभूमी / फुलराणी ची भूमिका तसेच राहुल मेहेंदळे यांनी रसिकराज, लखोबा लोखंडे, नटसम्राट ची भूमिका योग्य ते बेअरिंग सांभाळून केली आहे. ह्या शिवाय नचिकेत लेले चा बालगंधर्व, केतकी चैतन्य ची कृतिका / सईदा , शमिका भिडे ची मैना, शर्वरी कुलकर्णी ची नवी रंगभूमी, अमोल कुलकर्णी चा तळीराम, अवधूत गांधी चा नारद, यांच्याही भूमिका त्यांनी मनापासून केल्या आहेत. तसेच सुयोग्य अश्या वेशभूषेची जबाबदारी  नीता पणशीकर यांनी सांभाळलेली आहे.  सचिन गावकर यांनी उभारलेल नेपथ्य हे सुद्धा एक भूमिकाच करीत आहे असे जाणवते, त्याला अनुसरून शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना साकारलेली आहे ती सुद्धा परिणाम साधून जाते.

      हा रंगभूमीचा प्रवास उलगडत असतांना काही सोनेरी पानांचे दर्शन संगीत आणि गद्य च्या रूपाने विलक्षण उर्जेने सादर केला आहे असे म्हणायला हवे. एक सुरेल संगीतमय नाटक पाहिल्याचे समाधान मिळेल.

दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: