अभिनेता लोकेश विजय गुप्ते आता दिग्दर्शक म्हणून ‘एक सांगायचंय…. UNSAID HARMONY’ येतोय. या चित्रपटात बॉलिवूडमधील अभिनेता के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव ही जोडी पहिल्यांदाच मराठीत एकत्र झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. पुष्पांक गावडे सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांनी वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे तर ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.
येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply