चित्रपट परीक्षण – हेलिकॉप्टर ईला ‘आई-मुलाची जनरेशन कथा’

  आई आणि मुलगा ह्यांचे प्रेम खूप गहिरे असते. आई आपल्या मुलाची काळजी हि खूप चांगल्याप्रकारे घेत असते. मुलगा लहान असतांना त्याची काळजी घेणे हे योग्यच आहे पण तो तरुण झाला, कॉलेज मध्ये जाऊ लागला तर त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घातले तर काय होईल. या  कल्पनेवर आधारित हा सिनेमा आहे.Film Helecoptar Eela.3

      ईला आणि विवान ह्या आई – मुलांच्यावर आधारित कथा आहे. ईला हि एक गायिका, अरुण नावाचा तिचा मित्र असून तो काहीसा विक्षिप्त आहे. पण दोघांचे एकमेकावर प्रेम, त्यांचे लग्न होते, त्यांना विवान नावाचा मुलगा होतो. काही कारणाने अरुण घरातून निघून जातो. तो अनेक वर्षे घरी येत नाही. विवान ची आई आणि वडील हि ईला बनते, दोन्ही नाती ती उत्तम सांभाळते. लहानपणी जशी ती विवान ची काळजी घेते त्याप्रमाणे तो कॉलेज मध्ये जातो त्यावेळी सुद्धा ती काळजी घेते. त्यासाठी ती त्याच्या कॉलेज मध्ये त्याच्याच वर्गात विध्यार्थी म्हणून प्रवेश घेते.

      विवान ला ते पसंत नसते. कॉलेज मधील मित्र त्याची फिरकी घेतात. एक दिवस ईला आणि विवान चे भांडण होते आणि विवान घर सोडून निघून जातो. त्याचवेळी ईला ची सहेली तिला सल्ला देते कि तू विवान च्या प्रत्येक बाबतीत लक्ष घालणे सोडून दे. तू तुझ्या गायिकेचा विचार कर आणि तुझे स्वतंत्र आयुष्य जगायला सुरवात कर.

Film Helecoptar Eela

     शेवटी नेमके काय घडते ? विवान घरी परत येतो का ? कॉलेज मध्ये काय काय घटना घडतात ? त्यातून ईला ला आपला गायिकेचा मार्ग सापडतो का ? ईला चा नवरा परत येतो का ? त्याचे पुढे काय होते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.

     काजोल ने ईला ची मध्यवर्ती भूमिका सहजतेने साकारली आहे. मुलाविषयीच्या सर्व भावना उत्तम व्यक्त केल्या आहेत. विवान ची भूमिका रिद्धी सेन यांनी केली असून त्या भूमिकेला त्याने न्याय दिलेला आहे. त्याच्या मनाची होणारी घुसमट आणि आई विषयीचे प्रेम ह्या भावना छान दाखवल्या आहेत. या शिवाय नेहा धुपिया, तोतारोय चौधरी असे अनेक कलाकार आहेत. गीत/संगीत दोन्ही बाजू उत्तम, गतिमान संकलन, छायाचित्रण चांगले, त्याचप्रमाणे कथा-पटकथा-संवाद सहजपणे जमून आले आहेत. आई आणि मुलगा ह्या पिढीवर सिनेमा सहजपणे भाष्य करतो. एकंदरीत एक आनंददायी समाधान देणारा सिनेमा आहे.

दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.