
अशा चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळवलेला निर्माता, सह दिग्दर्शक आणि प्रस्तुतकर्ता अमोल कागणे आता अभिनयात पदार्पण करत आहे. मिलिंद उके दिग्दर्शित “मान्सून फुटबॉल” या बहुचर्चित चित्रपटातून अमोल अभिनयाची इनिंग सुरू करत असून, तो गुजराती पतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

“मान्सून फुटबॉल”मध्ये अमोलसह अभिनेत्री सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक अशी दमदार स्टारकास्ट आहे. या सगळ्या अभिनेत्री साडी नेसलली असतानाच फुटबॉल खेळताना दिसतील. गृहिणी झाल्यावर आपली पुसली गेलेली ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मान्सून फुटबॉल या चित्रपटासह अमोल बाबो, अहिल्या, झोलझाल, भोंगा, तुझं माझं अॅरेंज मॅरेज अशा चित्रपटातूनही अभिनेता म्हणून दिसणार आहे. उत्तम निर्माता आणि प्रस्तुतकर्ता म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर अमोल उत्तम अभिनेता म्हणूनही ओळख निर्माण करेल.
Leave a Reply