
आतापर्यंत अभिनयाची ठसठशीत छाप उमटवणारा अभिनेता लोकेश गुप्ते आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक वर्षे अभिनयक्षेत्र गाजवल्यावर ज्याप्रमाणे कलावंताला दिग्दर्शन क्षेत्र खुणावू लागते; त्याला लोकेश गुप्ते सुद्धा अपवाद ठरलेला नाही. ‘एक सांगायचंय…’ या चित्रपटाच्या निमित्ताने लोकेशने दिग्दर्शकीय पाऊल उचलले असून, या चित्रपटाद्वारे तो काहीतरी संवेदनशीलतेने सांगू पाहतो आहे.
लोकेशने दिग्दर्शकीय पदार्पणातच मोठी झेप घेतली आहे, ती अभिनेता के.के.मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांना मराठीत आणून! त्याच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटात हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. लोकेशने या चित्रपटाचे लेखन व संकलनही केले आहे. के.के.मेनन व राजेश्वरीसह पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदी कलाकारही यात आहेत. गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वे, ध्वनी आरेखनासाठी ऑस्कर विजेता रेसूल पुकुट्टी, सिनेमॅटोग्राफी पुष्पांक गावडे, वेशभूषा चैत्राली लोकेश गुप्ते अशी तगडी टीम लोकेशने या चित्रपटासाठी जमवली आहे. १६ नोव्हेंबर रोजी लोकेशचा हा चित्रपट पडद्यावर येत आहे.
Leave a Reply