परीक्षार्थी असावे की ज्ञानार्थी… हा एकच सवाल आहे…! 

Atharva Bedekar– राज चिंचणकर
       ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात नाथा चितळे ही भूमिका रंगवणारा बालकलाकार अथर्व बेडेकर याला असलेल्या वाचनाच्या छंदाचे प्रतिबिंब, माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात पडले. यावेळी अथर्व वाचनसंस्कृती विषयी तर बोललाच; परंतु ‘मुलांनी परीक्षार्थी असावे की ज्ञानार्थी हा एकच सवाल आहे’, असा थेट प्रश्न विचारत त्याने श्रोत्यांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ निर्माण केले.
       वाचनसंस्कृतीची जोपासना करत सांस्कृतिक वसा जपणाऱ्या माहीम सार्वजनिक वाचनालयाने या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अथर्वला वाचनालयात खास निमंत्रित केले होते. यावेळी अथर्वने विद्यार्थीदशेतल्या काही प्रश्नांना वाचा फोडली. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा प्रश्न रंगभूमीवरच्या नटसम्राटाला पडला होता. पण आजच्या विद्यार्थ्यांच्या पुढे नटसम्राटापेक्षाही गहन प्रश्न उभे ठाकले आहेत, असे वास्तव निरीक्षणही त्याने नोंदवले. ‘वाचन प्रेरणा दिन’ आहे, म्हणून फक्त आजच्या दिवशीच वाचायचे का, असा प्रश्न उपस्थित करत निदान आजपासून तरी सर्वांनी काही ना काही वाचायला सुरुवात केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
       सगळ्या प्रकारची पुस्तके मला वाचायला आवडत असली, तरी त्यातही साहसी पुस्तके मला अधिक आवडतात. नाट्यवाचन करायलाही मला आवडते. पु.ल.देशपांडे यांची लेखनशैली मला अधिक भावते. ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे माझे आवडते नाटक आहे, असे सांगत, ‘जो वाचेल तोच वाचेल’, अशा शब्दांत अथर्वने त्याची वाचनविषयक भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.