प्रेमी जोडप्यांच ‘गॅटमॅट’ जुळवून देतोय सिनेमाचे टीझर 

GAT MAT 05
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?… या प्रश्नांमध्येच अनेकांचा ‘गॅटमॅट’ राहून जातो. लव्हस्टोरी सुरु होण्याआधी दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. पण ती किंवा तो काय विचार करेल या न्यूनगंडात सर्वच काही राहून जातं. अश्या या अव्यक्त भावनांचे मिलन करून देणारी ‘गॅटमॅट’ ही संस्था येत्या १६ नोव्हेंबरपासून गरजवंतांच्या सेवेला हजर राहणार आहे. मोठ्या पडद्यावर सादर होत असलेल्या या ‘गॅटमॅट’चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित ‘गॅटमॅट’ या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे.
या सिनेमाच्या टीझरमधून कॉलेजविश्वातील रंगीत दुनिया आपल्याला पाहायला मिळते. तरुणाईने बहरलेल्या या टीझरमध्ये ‘गॅटमॅट’ चे संस्थापक रंग्या आणि बगळ्या आपल्याला दिसून येतात. गावावरून आलेली ही सामान्य मुलं कशा पद्धतीनं कॉलेजकट्ट्यावर ‘गॅटमॅट’ चा फड रंगवतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये अक्षय टंकसाळे बरोबर रसिका सुनील आणि निखील वैरागर बरोबर पूर्णिमा डे अशी जोडीदेखील आपल्याला पाहायला मिळते. मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणारे ‘गॅटमॅट’ सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गाला लुभावणारे ठरत आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी हा ‘गॅटमॅट’ मनोरंजनाची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.