
– राज चिंचणकर
गंभीर विषयाचा विनोदी ढंग, अशा पठडीत फिट्ट बसणाऱ्या ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाची रंगभूमीवर घौडदौड सुरु असून, आता हे नाटक २५ व्या प्रयोगाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. शुभारंभाचे सलग सहा दिवस प्रयोग रंगवलेल्या या नाटकाने मुंबई, पुणे, सोलापूर, अमरावती, नाशिक आदी ठिकाणी पोहोचत महाराष्ट्राचा दौरा धडाक्यात सुरु केला आहे.
आनंद म्हसवेकर लिखित व शिरीष राणे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती अनुराधा सामंत यांनी केली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, शर्वरी गायकवाड, देवेश काळे, संजय देशपांडे, सुचित ठाकूर व नीता दिवेकर हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत.
Leave a Reply