व्हॅनिला, स्ट्रोबेरी आणि चॉकलेट- मैत्र जीवांचा वेगळा अनुभव…

VANILLA & TEJU      पाळीव प्राणी आणि माणुस यांचे जिव्हाळ्याचे संबंध असतात, आपण जर कोणा एका पाळीव प्राण्याला मनापासून सांभाळले तर तो प्राणी सुद्धा आपल्याशी तितक्याच प्रेमाने वागतो, अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित “ प्राणी मैत्री “ चा संदेश देणारा “ व्हॅनिला, स्ट्रोबेरी आणि चॉकलेट हा सिनेमा आहे.

      हि कथा आहे तेजू आणि व्हानीला नावाच्या डॉगी ची अर्थात एका कुत्री ची त्या दोघांच्या मैत्रीची – प्रेमाची  – आपुलकीची कथा मांडली आहे. माथेरान मध्ये पर्यटकांना घोडयावरून फिरवून अर्थात त्यांना सैर घडवून आणणारे बाबू पवार ह्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू हे सदस्य असतात, आणि एक दिवस अचानकपणे व्हानीला डॉगी चा प्रवेश होतो, माथेरान मधील ग्रामपंचायतीच्या शाळेत तेजू शिकत असते, त्या शाळेच्या आवारात राहणारी पांढरीशुभ्र रंगाची डॉगी तेजुला आवडते, त्या दोघांची मैत्री होते, तिच्यासाठी तेजू शाळेत लवकर जाते, त्याच सुमारास तेजूची दहावीची परीक्षा असते, त्या डॉगी चे काय होणार ह्या कल्पनेने ती अस्वस्थ होते, डॉगीला घरी आणण्याची परवानगी मागते, पण तिची दुसरी बहिण मंजू बाळंतपणासाठी येणार असल्याने परवानगी मिळत नाही. त्याच वेळी ग्रामपंचायती मधील कर्मचारी बेवारशी कुत्री शोधण्याची मोहीम हाती घेतात, आता नेमके काय घडते ? व्हानीला डॉगी ला तेजू कशी सभालते ? घरातून तेजू कोणासाठी बाहेर जाते ? व्हानीला ला सुद्धा पिल्ले होणार असतात त्यावेळी तेजू काय करते ? एक दिवस तेजुला डॉगी दिसत नाही !!! तेजुच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो ? असे उत्कंठा वाढवणारे भावनिक प्रश्न निर्माण करीत शेवटी काय घडते हे सिनेमात पहा.

      जानकी पाठक हिने तेजूचा अल्लडपणा, तिचे प्राण्याविषयी असणारे प्रेम इत्यादी भावना छान व्यक्त केल्या आहेत. रवी काळे यांचा बाबू पवार हा मनाला भावतो. राधिका देशपांडे, राजश्री निकम, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव यांनी त्यांच्या भूमिका मनापासून केल्या आहेत. संगीत ठीक आहे. छायाचित्रण आणि संकलन ठीक असून दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ यांनी सिनेमा बंदिस्तपणे सादर केला आहे.

     प्राणी आणि माणुस ह्याचे एक अलिखित नाते निर्माण होते किंवा झालेलं असते, एकमेकांना बघितल्या शिवाय, भेटल्याशिवाय दोघांना चैन पडत नाही, हे नाते एक वेगळेच ऋणानुबंध निर्माण करते. एकंदरीत सिनेमा ठीक आहे.

     आता प्रेक्षकांचे ऋणानुबंध कसे मिळतात ते प्रेक्षकच ठरवतील.

दीनानाथ घारपुरे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.