नशिबवान’ भाऊंची पडद्यामागची मेहनत 

    एखादा चित्रपट यशस्वी करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेत असतो. त्यांच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी हरप्रकारे काम करण्यास ते तयार असतात. याचे आताचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ कदम यांचा आगामी ‘नशीबवान’ चित्रपट.
LandmarcFilms' Nashibvaan-Still2
या चित्रपटामध्ये  भाऊ सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका खरी वाटावी, म्हणून भाऊ यांनी खरोखरच कचरा उचलून साफसफाई केली आहे. यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितले तसेच सार्वजनिक स्वछतागृहाची सफाई देखील करायला लावली.
LandmarcFilms' Nashibvaan-Still3
या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे मुलुंड परिसरात झाले आहे. आपल्या भूमिकेविषयी भाऊ कदम म्हणाले, की या चित्रपटाच्या निमित्ताने मी सफाई कामगाराच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या, त्यांना होणारे आजार, समाजाकडून त्याची होणारी हेटाळणी हे सर्व बघताना स्वतःचा तिरस्कार वाटायला लागला.  कारण आपण निरोगी आरोग्य जगावे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा, यासाठी हे लोक घाणीमध्ये काम करतात,आपला कचरा उचलतात. खरंच खूप ग्रेट आहेत हे लोक. रात्रंदिवस झटणारे हे कामगार माझ्यासाठी खरे हिरो ठरले आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल शब्दांत व्यक्त होऊ न शकणारा आदर  निर्माण झाला.
‘नशीबवान’  हा सिनेमा  उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत असून, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी या सिनेमाची  निर्मिती केली आहे. हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.