
– राज चिंचणकर
हे शीर्षक वाचल्यावर, काहीतरीच काय, असा विचार लगेच मनात येऊ शकतो किंवा यात काहीतरी चूक झाली असावी, असेही वाटू शकते. पण तसे काही नाही. मास्तर आणि आयटेम सॉन्ग असे परस्परविरोधी समीकरण जुळले आहे, ते ‘तू तिथे असावे’ या चित्रपटाच्या निमित्ताने! ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनीच ही बाब उघड केली आहे.
त्याचे काय आहे ना… या चित्रपटात विजय पाटकर यांनी एका मास्तरांची भूमिका साकारली आहे. पण त्यांचे वागणे विचित्र आहे. भूमिकेची गरज म्हणून त्यांच्यावर एक आयटेम सॉन्ग चित्रित केल्याचे विजय पाटकर सांगतात. आता हे नक्की काय प्रकरण आहे ते समजण्यासाठी ७ डिसेंबरची, म्हणजेच हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
Leave a Reply