– राज चिंचणकर
‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भाग डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे; हे तर सर्वांना माहित आहेच. या भागात नक्की काय असणार, याची उत्सुकता प्रेक्षकवर्गाला लागून राहिली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेचे चाहते तर हा चित्रपट पाहायला आवर्जून जाणारच आहेत; परंतु अजून एक खास व्यक्ती हा चित्रपट पाहणार आहे.

थांबा… तुमची उत्सुकता अधिक ताणत नाही. ही व्यक्ती म्हणजे एक वर्षाचे बाळ आहे. पण हे बाळ सर्वसाधारण नाही; तर येत्या ७ डिसेंबर रोजी पहिला वाढदिवस साजरा करणारे हे बाळ म्हणजे स्वप्नील जोशी याचा मुलगा राघव आहे. काय योगायोग आहे पहा… गेल्या वर्षी ७ डिसेंबरला स्वप्नील जोशीच्या आयुष्यात राघवने पाऊल टाकले, तेव्हा ‘मुंबई पुणे मुंबई ३’ चित्रपटाची प्रक्रिया सुरु झाली आणि आता राघवच्या पहिल्या वाढदिवसाला स्वप्नीलचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याबाबत बोलताना स्वप्नील म्हणतो, ‘राघव त्याच्या आयुष्यातला पहिला चित्रपट पाहणार आणि तोही माझा, याचा आनंद काही औरच आहे’.
Leave a Reply