सगळ्यानाच माहिती आहे रामदास आठवले यांना उत्सुफुर्त कविता सुचतात आणि तो त्यांचा हातखंडच आहे… कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितले,त्यांना सभेमध्ये, पार्लमेंट मध्ये बसून कविता लिहण्याची सवय आहे… तसेच आनंद शिंदे यांना त्यांच्या गाण्यांचा नेमका अर्थ मकरंद यांनी विचारला… तर रामदास आठवले यांना विचारले शोले सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारायला आवडली असती त्यावर रामदासजी म्हणाले अमिताभ बच्चन यांची तर धर्मेंद्रची उद्धव ठाकरे आणि गब्बरचीशरद पवार यांनी साकारली असती… आनंद शिंदे यांनी त्यांच्या लहानपणाची आठवण सांगताना म्हणाले “माझ्या बारश्याला माझ्या वडीलांनी मला १०,००० रुपयांवर झोपवले होते… मला लहान असताना कधीच वाटले नाही, गायक होईन मला वाटलं होतं कि, म्युन्सिपालटी मध्ये काम करेन… पण माझ्यात प्रल्हाद शिंदे यांचे रक्त….त्यामुळेच आज मी गायक आहे…
चक्रव्ह्यू राउंडमध्ये आनंद यांना आदर्श शिंदेची एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता ते म्हणाले “आदर्शने मला जिंवत ठेवले आहे” आता असे ते का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम बघायला लागेल… तसेच खटकणारी गोष्ट सांगताना ते म्हणाले “तो खूप भित्रा आहे” … इथेच हा प्रश्न उत्तरांचा खेळ संपला नाही तर मकरंद यांनी आनंद शिंदे आणि रामदास आठवले यांना काही प्रश्न विचारले … आनंद शिंदे यांना विचारले, त्यांच्या आवडीचा गायक कोण – मिलिंद शिंदे कि आदर्श शिंदे ? आवडता नेता कोण – प्रकाश आंबेडकर कि रामदास आठवले ? तसेच आवडता संगीतकार कोण – अवधूत गुप्ते कि अजय अतुल ?रामदास आठवले यांना विचारले आवडता नेता कोण – राजा ढाले कि नामदेव ढसाळ ? उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण – शरद पवार कि देवेंद्र फडणवीस ? तसेच कोणता पक्ष पुरोगामी बीजेपी कि कॉंग्रेस ? तसेच सभा जिंकून घेणारे कोण – नरेंद्र मोदी कि बाळासाहेब ठाकरे ? याची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत…
हि धमाकेदार जोडी येतेय अस्सल पाहुणे इरसाल नमुने मध्ये येत्या गुरु – शुक्र रात्री ९.३० वाजता तुमच्या भेटीला