‘कॉमेडीकिंग’ भाऊ कदम यांच्या ‘नशीबवान’चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार…? ही प्रतीक्षा अखेर संपली असून’नशीबवान’ चा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ट्रेलरवरून तरी या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असं दिसतंय. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतानाही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. भाऊ कदम यांच्या अफलातून अभिनयासोबतच, त्यांचे खुसखुशीत विनोदही प्रेक्षकांना खदखदून हसवणारे आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी केल्यामुळे हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतोय. शिवाय या चित्रपटात कलाकारांना अतिशय नैसर्गिक रूपात दाखवण्यात आले आहे, त्यांना मेकअपही केलेला नाही. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी केली आहे. भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांसारख्या दमदार अभिनेत्री या चित्रपटात आहेत. या जबरदस्त ट्रेलरवरून चित्रपटही एकदम झकास असेल यात शंका नाही.
हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
You Tube Link : https://www.youtube.com/watch?v=y2dcwljeJS0
Leave a Reply