‘आयला आला रे सचिन ‘ म्हणत स्वप्नीलचा धमाका

“मी पण सचिन” नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग चित्रित करण्यात आले. ‘आयला आयला सचिन’ असे या जोशमय गाण्याचे बोल असून सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणे एक पर्वणीच ठरणार आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित झाले आहे. बाजार म्हटले, की डोळ्यांसमोर येतात ते भाजीवाले, बॅण्डवाले, वासुदेव, आणि लहान मुले. यांच्यासह सचिनचे भव्य पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.
‘आयला आयला सचिन’ हे गाणं त्रिनीती ब्रदर्स म्हणजेच हर्षवर्धन वावरे, करण वावरे,आदित्य पाटेकर  यांनी संगीतबद्ध केले असून आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
1Z3A0952IMG_7641
आम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना या गाण्याद्वारे ट्रिब्युट देणार आहोत.आणि त्याचमुळे हे गाणं करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती म्हणून हे गाणं करताना खूप मजा आली.असे या चित्रपटाचे निर्माता श्रेयस जाधव यांनी सांगितले. तर स्वप्नील म्हणतो कि हा सिनेमा फक्त क्रिकेट वर आधारित नसून आयुष्यावर पण तितकाच आधारित आहे. कारण आयुष्य आणि क्रिकेट मध्ये खूप साम्य असते. क्रिकेट आणि आयुष्यात मध्ये आपण पुढच्या क्षणाला काय होईल ह्याचा अंदाज बंधू शकत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.