‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

2मराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. याच पठडीतला नवनाथांच्या महात्म्यावर आधारित ‘बोला अलखनिरंजन’ हा भक्तीमय चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाची शानदार  झलक व संगीत अनावरण सोहळा नुकताच डॉ.जियाजी नाथ (राष्ट्रीय अध्यक्ष…अखिल भारतीय नाथपंथीय महासंघ, मुंबई) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. ‘मातृपितृ फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घनशाम येडे यांनी सांभाळली आहे.

या प्रसंगी बोलताना दिग्दर्शक घनशाम येडे सांगतात की, नवनाथांचा हा चित्रपट माझा ध्यास होता. त्यांच्याच कृपेने माझी स्वप्नपूर्ती झाली असून वैचारिक उद्बोधन आणि रंजकता यांचा सुरेख मेळ या चित्रपटात प्रेक्षकांना पहाता येईल. प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणारा हा चित्रपट असेल असा विश्वास व्यक्त करतानाचा दिग्दर्शक घन:श्याम येडे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला दाद देत घनशाम येडे यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाला कलाकारांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

तीन सुरेख गीतांचा भक्तीमय नजराणा ‘बोला अलखनिरंजन’ या चित्रपटात आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी  भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे.नाथ संप्रदायाचे महात्म्य, त्यांची शिकवण आजच्या काळातही तितकीच उपयुक्त आहे हे सांगताना शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यच्या नवनाथांवरच्या निस्सीम श्रद्धेची किनार या चित्रपटाला जोडण्यात आली आहे. या संप्रदायाच्या शिकवणीने जीवनमान कसे चांगले होऊ शकते, विपरीत गोष्टींवर कशी मात करता येऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. अमोल कोल्हे,सिया पाटील, नागेश भोसले, दिपक शिर्के, दिपाली सय्यद, गायत्री सोहम, मिलिंद दास्ताने,प्रफुल्ल सामंत, रोहित चव्हाण, भक्ति बर्वे आणि घनशाम येडे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.