‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पदार्पण करून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारा अभिनेता विनीत भोंडे सध्या काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित ‘कळस’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात १९८३ ते १९८५ या काळातली गोष्ट दाखवण्यात येणार असून या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेत विनीत दिसणार आहे. नुकतेच विनीतने या सिनेमाचे संपूर्ण कथानक वाचले असून या सिनेमाला होकार दिला आहे.
या सिनेमात तो ‘धर्मा’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे.
याबाबत विनीत म्हणतो,’मी चांगल्या सिनेमाच्या शोधात होतो. त्यावेळी या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे व कॅमेरामन योगेश अंधारे यांची भेट झाली.त्यावेळी त्यांनी ‘कळस’ या सिनेमाची गोष्ट मला ऐकवली. ती गोष्ट ऐकून मी काही काळ सुन्न झालो. हतबल झालो आणि हा सिनेमा माझ्यासाठीच आहे असे मला वाटले. आजच्या समाजव्यवस्थेवर फेकलेला हा ओरखडा आणि वस्तुस्थिती मला या सिनेमात दिसली. मी या सिनेमातील माझ्या पात्राच्या प्रेमात पडलो आणि या भूमिकेसाठी तात्काळ तयारी सुरू केली.”
Leave a Reply