किती ‘लकी’ ठरणार संजय जाधव यांच्यासाठी वेगळे कलाकार…?  

– राज चिंचणकर
       ‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक संजय जाधव आणि त्यांचे जवळचे कलाकार, हा चित्रपटसृष्टीतला चर्चेचा विषय असतो. अभिनेता स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आदी कलाकार संजय जाधव यांच्या बहुतेक चित्रपटात भूमिका साकारताना दिसतात.
sanjay jadhav
या टीमने बरेच यशस्वी चित्रपटही दिले आहेत. त्यामुळे संजय जाधव यांचा नवीन चित्रपट येणार म्हटल्यावर त्यांची हीच टीम त्यात असणार, हे ठरूनच गेले होते. इथे ‘होते’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांचा ‘लकी’ हा येऊ घातलेला चित्रपट!  हा चित्रपट मात्र याला अपवाद ठरला आहे. या चित्रपटात त्यांनी चक्क त्यांच्या टीममधल्या कलाकारांना न घेता वेगळी वाट चोखाळली आहे. अभय महाजन, दीप्ती सती हे कलाकार ‘लकी’मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. याविषयी बोलताना संजय जाधव म्हणतात, माझे नेहमीचे कलाकार घेऊन मी सतत चित्रपट केल्यावर माझ्यावर अनेकदा टीका केली गेली. ‘लकी’ हा चित्रपट मात्र त्याला उत्तर ठरू शकेल. आता संजय जाधव यांचे हे वेगळे कलाकार त्यांच्यासाठी किती ‘लकी’ ठरणार हे ७ फेब्रुवारी रोजी निश्चित होणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.