मराठी चित्रपटसृष्टीत ‘आनंदी गोपाळ’चे पडघम…!  

– राज चिंचणकर

       ज्या काळात भारतीय स्त्रीचे पाऊल घराबाहेर पडण्याची शक्यता नव्हती; म्हणजे तशी समाजरुढी होती, त्या म्हणजे सन १८८२ च्या काळात १८ वर्षे वयाच्या एका स्त्रीचे परदेशी जाणे हे एक धाडसच होते. पण एका भारतीय स्त्रीने हे पाऊल उचलले आणि केवळ इथेच नव्हे; तर परदेशी पोहोचल्यावरही अनेक पातळ्यांवर संघर्ष करत तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याची करामत केली. ही स्त्री म्हणजे डॉ. आनंदी जोशी यांनी!  अर्थातच, ‘भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर’ ही बिरुदावली त्यांच्या नावामागे लागली व सार्थही ठरली. अशा या आदर्शवत व्यक्तिमत्वाच्या प्रेमात चित्रपटसृष्टी पडली नसती, तरच नवल ठरले असते.

anandi-gopal-convocation-pic

       भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या याच आनंदीबाईंच्या चरित्रपटाचे पडघम आता मराठी चित्रपटसृष्टीत वाजू लागले आहेत. झी स्टुडिओज् यांनी त्यांचा जीवनपट साकारायचे ठरवले आणि त्यांचा हा संकल्प आता पूर्णत्वास गेला असून, येत्या १५ फेब्रुवारी रोजी ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पडद्यावर दाखल होत आहे. झी स्टुडिओज् चे मंगेश कुलकर्णी, नम: पिक्चर्सचे किशोर अरोरा व शारीन मंत्री केडिया, फ्रेश लाईमचे अरुणवा जॉय सेनगुप्ता; तसेच आकाश चावला यांनी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.

 

       समीर विद्वांस यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची पटकथा करण शर्मा यांची असून, इरावती कर्णिक यांनी संवादलेखन केले आहे. आनंदीबाईंची भूमिका भाग्यश्री मिलिंद हिने साकारली असून, गोपाळरावांनी भूमिका ललित प्रभाकर याने रंगवली आहे. गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, बाल कलाकार अंकिता गोस्वामी आणि अथर्व फडणीस यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुश्राव्य संगीत हा या चित्रपटाचा अजून एक पैलू आहे. ऋषिकेश-सौरभ-जसराज ह्या त्रयीच्या संगीताने सजलेली पाच गाणी या चित्रपटात आहेत. वैभव जोशी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्यांना केतकी माटेगावकर, शरयू दाते, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, रोहित राऊत आणि पं. संजीव अभ्यंकर यांनी स्वर दिला आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.