– राज चिंचणकर
मराठी चित्रपटसृष्टीत बराच काळ ‘पुनर्जन्म’ वगैरे झाला नव्हता. म्हणजे, या विषयाशी संबंधित काही चित्रपट आधी येऊन गेले असले, तरी पुनर्जन्म आदी प्रकारांनी मधल्या काळात बऱ्यापैकी ब्रेक घेतला होता. ही पोकळी भरून काढण्यासाठी ‘भेद’ हा मराठी चित्रपट पुढे सरसावला आहे. १५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

दिग्दर्शक प्रमोद शिरभाते यांच्या या चित्रपटात प्रेम, पुनर्जन्म, थरार, दोन पिढ्यांचे संबंध असा सगळा मसाला अस्सल गावरान मातीच्या सुगंधासह पेरण्यात आल्याचे समजते. अजित गाडे, श्लेषा मिश्रा, अभिषेक चौहान, राजेश बक्षी अशी स्टारकास्ट या ‘भेद’मध्ये आहे. चित्रपटात एकूण सहा गाण्यांचा तडका आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे या गाण्याचे निमित्ताने मराठीत पाऊल टाकत असल्याचीही खबर आहे. आता हा सगळा करिष्मा चित्रपटाला किती पाठबळ देतो, हे पाहण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत थांबणे भाग आहे.
————————————————————————————