– राज चिंचणकर
‘रॉकी’ या शीर्षकाचा मराठी चित्रपट येतोय हे एव्हाना जाहीर झाले आहे. पण हा ‘रॉकी’ नक्की आहे तरी कोण, याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली होती. संदीप साळवे हा अभिनेता यात ‘रॉकी’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. खऱ्याखुऱ्या ‘प्रकाश’वाटेवरून चालत हा रॉकी, मोठया पडद्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. संदीप सांगतो, मी पूर्वी थिएटरमध्ये बॅटरी घेऊन लोकांना सीट्स दाखवायचो. हे माझे काम होते. काळ बदलला आणि वाटचाल करत करत मी आता चित्रपटात हिरोची भूमिका साकारतोय. ज्या थिएटर्समध्ये मी काम करायचो; त्याच थिएटर्समध्ये माझा चित्रपट लागणार आहे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

अदनान शेख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. संदीप साळवे व अक्षया हिंदळकर अशी जोडी यात प्रमुख भूमिकेत आहे. त्यांच्यासह राहुल देव, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, अशोक शिंदे, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, दीप्ती भागवत आदी कलाकार या चित्रपट चमकत आहेत. ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
—————————————————————————–
Leave a Reply